आमच्या विषयी

आमच्या विषयी

बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा.श्री.शेखर सुरेश चरेगांवकर यांना सहकाराचे बाळकडू घरातूनच मिळाले. सहकार क्षेत्रात काम करण्याची आवड त्यांना सुरुवातीपासूनच होती. त्यामुळे त्यांचा पिग्मी एजंट ते एका सहकारी बँकेचा अध्यक्ष हा प्रवास खरोखरच नेत्रदिपक म्हणावा लागेल. 2002 साली यशवंत बँकेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हाती आल्यावर सर्व प्रथम थकबाकीचा डोंगर दूर करुन तसेच संचित तोटा भरून काढणे हे एकमेव लक्ष्य ठेवून त्यांनी व सहकारी संचालक मंडळाने कामकाज केले.

तत्कालीन संचालक मंडळातील सदस्य, अध्यक्ष, सल्लागार मंडळ तसेच सेवक यांच्या सहकार्यामुळे दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करता आली. त्यामुळेच बँक आज अतिशय सक्षमपणे कामकाज करत आहे. सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. बँकेचा व्यवसाय गेल्या १० वर्षात दहा पट म्हणजेच ३५ कोटींवरून ३५० कोटींपर्यंत पोहोचला आहे. मुख्यकार्यालय व ३ शाखांच्या माध्यमातून बँक आज कार्यरत आहे.सातारा, सांगली, पुणे, रत्नागिरी व सोलापूरअसे ५ जिल्ह्यांमध्ये बँकेचे कार्यक्षेत्र आहे. ही प्रगती साध्य करणे खरोखरच अविश्वसनीय बाब आहे. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे.

यशवंत महिला स्वयंरोजगार प्रतिष्ठानच्या माध्यमातून 10000 हून अधिक महिलांपर्यंत यशवंत बँक बचतगटांच्या स्वरुपात पोहोचलेली आहे. यातून रोजगार निर्मिती व खेडोपाडी तळागाळापर्यंत जिथे बँकिंग सेवा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी बचत खाती उघडणे व अर्थसहाय्य करणे या स्वरुपाचे कामाकाज आपली बँक करीत आहे. सुमारे 15 कोटीहून अधिक रकमेचे अर्थसहाय्य या बचतगटांच्या माध्यमातून बँकेने केलेले आहे. भारत सरकारच्या महिला कल्याण व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून रु. 1 कोटींचा निधी अल्प व्याजदरामध्ये बँकेस प्राप्त झालेला असून महिलांच्या अर्थसहाय्यासाठी यशवंत बँक त्याचा विनियोग करीत आहे. पश्चिसम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा निधी प्राप्त होणारी आपली एकमेव बँक आहे. सहभाग कर्ज योजनेअंतर्गत देखील इतर बँकांच्या सहकार्याने उत्तम पद्धतीचे कामकाज चालू आहे.

श्री चरेगांवकर यांचे कुशल नेतृत्त्व, कल्पकता व इतर सर्वांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे यशवंत बँकेस हे यश प्राप्त झाले आहे.

अर्थकारणाबरोबरच बँक अनेक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवीत असते. वृक्षारोपण, जलसंधारण, रक्तदान, लॉकडाऊन काळात नागरिकांना शिधा वाटप असे अनेक उपक्रम बँकेने संपन्न केले आहेत.

‘यशवंत महोत्सव’ हि यशवंत बँकेची अनोखी ओळख आहे. सातत्याने १० वर्षे या सास्कृतिक महोत्सवाचे आयोजन बँक करत आहे.

जास्तीतजास्त कामकाजाच्या वेळा, कमीतकमी सुट्ट्या, जेष्ठ नागरिकांना घरपोच बँकिंग सेवा या वैशिष्ठ्यांद्वारे बँकेने आपले वेगळेपण जपले आहे.