घर बांधणी कर्ज

घर बांधणी कर्ज

कर्ज कोणास घेता येईल ?

1. अशा प्रकारचे कर्ज घेण्यासाठी बँकेचा अ वर्ग सभासद होणे आवश्यक आहे.

2. अर्जदार व जामिनदार कर्ज रक्कम परतफेडीचे दृष्टीने उत्पन्नधारक असावेत.

3. योजनेचे नाव यशवंत गृह कर्ज

4. गृह कर्ज मर्यादा ५० लाख

5. मूल्यांकनाच्या ८०% पर्यंत कर्ज

6. कमाल मुदत १८ वर्ष

कर्जाची रक्कम :-

कर्जाची वैयक्तिक कमाल मर्यादा (विनातारण) रिझर्व्ह बँक व मा.संचालक मंडळाच्या आदेशानुसार वेळोवेळी ठरविण्यात येईल.

कर्जाचे कारण/तारण :-

1. घर बांधणी/फ्लॅट खरेदी/घर दुरूस्ती

2. कमाल कर्ज मर्यादा – घराच्या मुल्यांकनाच्या जास्तीत जास्त 70% पावेतो.

3. परतफेडीची मुदत (कमाल) – 20 वर्षे (240 महिने) राहील.

4. व्याजदर द.सा.द.शे. 12% व दंडव्याज द.सा.द.शे. 2% प्रमाणे आकारण्यात येईल.

दुरावा (मार्जिन) :-

1. नविन घरासाठी 20% व जुन्या घरासाठी / घर बांधकामासाठी 30% दुरावा ठेवण्यात येईल व दुराव्याची रक्कम बचत/चालु खात्यात जमा केलेली असावी.

2. घर बांधकामाच्या इस्टिमेटच्या 70% कर्ज मंजूर करण्यात येईल.

कर्ज व्यवहार असमाधानकारक असल्यास (सलग 3 हप्ते थकविल्यास खाते एनपीए झाल्यास) संपूर्ण कर्जाची एकरकमी व्याजासह परतफेड करावी लागेल.
व्याजदर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार व संचालक मंडळाच्या मंजुरीनुसार वेळोवेळी बदल अधिकार बँकेच्या संचालक मंडळास राहील.